अपंगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. अब्दुल कलाम यांचे हस्ते राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारताना डॉ. वा. ना. तुंगार.
About Us
संस्थेने सन २००४ साली पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात ग्रामीण अपंगांच्या पुनर्वसनासाठी समाजाधारित अपंग पुनर्वसन कार्यक्रम सुरू केला. मुळशी तालुक्यात अपंगांचे सर्वेक्षण करून १४४८ अपंगांची (८३५ पुरुष, ६१३ स्त्रिया) माहिती संकलित केली. अपंगांची वयानुसार वर्गवारी करून आर्थिक, सामाजिक स्तराची माहिती जाणून घेतली. अपंगांना त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगाराद्वारा विकासाच्या स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध करून दिल्या. ग्रामीण समाजातच त्यांना क्षमता व कुवतीनुसार विविधांगी प्रशिक्षण देऊन व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रत्यक्ष सहकार्य केले. अपंग आर्थिक विकास महामंडळाकडून १४ अपंगांना दुग्धोत्पादनासाठी प्रत्येकी १ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले. या सर्व अपंगांना वैयक्तिक गरजेनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने उपचार, कृत्रिम अवयव व साधने देण्यात आली. ग्राम पातळीवर शिक्षक, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, ग्रामपंचायत व सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांचा सहभाग घेऊन त्यांना अपंग पुनर्वसन विषयक कायदे (१९९२ ते १९९९) व शासनाच्या या संदर्भातील सर्व योजनांची माहिती दिली. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील अपंगांच्या पुनर्वसनाला फार मोठी चालना मिळाली. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम संस्थेद्वारा राबविले जातील.
We work to bring smiles, hope, and a brighter future to those in need.
१) मतिमंद बालकांचे आय. क्यु, सर्टिफिकेट
२) जन्मतारखेचा दाखला
३) ५ फोटो
६) जातीचा दाखला
७) वयोगट ६ ते १८
८) अपंग शिष्यवृत्ती प्रत्येक विद्यार्थ्यांस दरमहा रु. ७०/-
९) निरामय आरोग्य विमा योजना
Our Team