जीवनधारा
+91 9403926050 jeevandharapune@gmail.com

आमच्याबद्दल

जीवनधारा संस्थेची स्थापना, इतिहास आणि आमचे ध्येय

डॉ. वा. ना. तुंगार

संस्थापक अध्यक्ष

संस्थापकाबद्दल

"दिव्यांगांसाठी एक नवीन जग निर्माण करणे हे माझे स्वप्न आहे"

डॉ. वा. ना. तुंगार यांनी दिव्यांगांच्या क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा अधिक काळ निस्वार्थपणे सेवा केली आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील ग्रामीण दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

मुळशी तालुक्यात सुरू केलेल्या समाजाधारित पुनर्वसन कार्यक्रमामुळे १४४८ दिव्यांगांचे जीवन बदलले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाची दखल घेऊन तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. अब्दुल कलाम यांनी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.

राष्ट्रपती मा. डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार
0 + वर्षांचा अनुभव
0 दिव्यांग सर्वेक्षण
0 पुरुष दिव्यांग
0 महिला दिव्यांग
0 दुग्धोत्पादन उद्योजक

आमचे ध्येय आणि दृष्टी

आमचे ध्येय (Mission)

  • विशेष मुलांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकास
  • पालकांना सल्ला व मार्गदर्शन देणे
  • शैक्षणिक, वैद्यकीय, सामाजिक व आर्थिक पुनर्वसन
  • दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे
  • दिव्यांगांना स्वावलंबी व उपयुक्त घटक बनवणे

आमची दृष्टी (Vision)

एक असे समाज निर्माण करणे जिथे प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला समान संधी, आदर व सन्मान मिळेल. जिथे दिव्यांगत्व हे अडथळा नसून एक वेगळी शक्ती मानली जाईल.

ग्रामीण व शहरी दिव्यांगांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसन केंद्र उभारणे व त्यांना आत्मनिर्भर जीवन जगण्यास सक्षम करणे हे आमचे दीर्घकालीन स्वप्न आहे.

संस्थेचा प्रवास

१९६८

संस्थेची स्थापना

सन १९६८ साली जीवनधारा दिव्यांग सहाय्यकारी संस्थेची स्थापना जाली. दिव्यांगांसाठी समर्पित सॆजन्य सेवा सुरू केली.

२००५

दिव्यांग सर्वेक्षण

मुळशी तालुक्यात १४४८ दिव्यांगांचे (८३५ पुरुष, ६१३ स्त्रिया) सर्वेक्षण पूर्ण केले.

२००६

राष्ट्रीय पुरस्कार

तत्कालीन राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते दिव्यांगांच्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.

२००८

आर्थिक सहाय्य

दिव्यांग आर्थिक विकास महामंडळाकडून १४ दिव्यांगांना दुग्धोत्पादनासाठी प्रत्येकी १ लक्ष रूपयांचे अर्थसहाय्य मिळवून दिले.

१९८५

जीवनधारा विद्यालय स्थापना

सन १९८५ साली विशेष मुलांसाठी जीवनधारा विद्यालयाची स्थापना. मतिमंद व दिव्यांग बालकांसाठी विशेष शाळा सुरू केली. प्रशिक्षित शिक्षक व आधुनिक सुविधांसह.

आजपर्यंत

अखंड सेवा

संस्था आजही दिव्यांगांसाठी शिक्षण, वैद्यकीय उपचार, व्यावसायिक प्रशिक्षण यांमध्ये अखंडपणे कार्यरत आहे.