तत्कालीन राष्ट्रपती मा. डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त संस्था. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित.
संस्थेची स्थापना सन १९६८ साली दिव्यांग सहाय्यकारी संस्था म्हणून जाली. सन १९८५ साली जीवनधारा विद्यालयाची स्थापना केली. सन २००४ साली मुळशी तालुक्यात समाजाधारित दिव्यांग पुनर्वसन कार्यक्रम सुरू केले. मुळशी तालुक्यात दिव्यांगांचे सर्वेक्षण करून १४४८ दिव्यांगांची माहिती संकलित केली.
दिव्यांगांना त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, स्वयंरोजगाराद्वारा विकासाच्या स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध करून दिल्या.
गरजूंसाठी हास्य, आशा आणि उज्ज्वल भविष्य घेऊन येण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.
आपली आर्थिक मदत एका दिव्यांग मुलाला शिक्षण, उपचार आणि पुनर्वसनाची संधी देते. UPI द्वारे सहज मदत.
प्रवेशासाठी अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.